नागपूर -पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत कमाल चौक भाजीबाजार परिसरात शिवीगाळच्या कारणावरून झालेल्या वादात एका नशा केलेल्या व्यक्तीने भिकाऱ्याची हत्या केल्याची घटना सोमवारी (आज) घडली आहे. रात्री नशेत दोघांमध्ये शिवीगाळ आणि नंतर वाद झाला. याचवेळी रागात डोक्यावर दगड घातल्याने भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यात मृतकाचे आडनाव बोरकर असल्याची माहिती आहे. तर अटक केलेल्या आरोपीचे नाव भुर्या उर्फ सोनू वल्द अब्दुल शकुर असे आहे. कमाल चाैकाजवळ भरणाऱ्या भाजीबाजार बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी या परिसरात अंधारात नशा केला जातो. याच भागात कचरा वेचून जगणारा बोरकर नामक भिकारी आणि भुऱ्या हे दोघेही एकमेकास ओळखत होते. दोघेही सोबत बसून नशा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास दोघांनी नशा केला. यावेळी दोघात शिवीगाळ केल्याने वाद झाला मारहाण झाली. यात भुऱ्याने दगड उचलून डोक्यावर टाकला. यात बोरकर नामक भिकारी हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीने पंक्चरच्या ट्यूबचा केला होता नशा