नागपूर -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सदानंद फुलझले यांनी संपूर्ण आयुष्य दीक्षाभूमीसाठी समर्पित केले.
बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचे निधन - dr babasaheb ambedkars collaborator sadanad fulzele passed away
सदानंद फुलझेले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या दीक्षाभूमी येथे 3 ते 5 वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्य संस्कार संध्याकाळी 6 वाजता अंबाझरी घाट येथे होतील.
![बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचे निधन बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचे निधन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6417278-thumbnail-3x2-nagpur.jpg)
बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचे निधन
बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळयाची संपूर्ण जबाबदारी सदानंद फुलझेले यांनी सांभाळलेली होती. आयुष्याच्या शेवटपर्यंत फुलझेले यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामात स्वत:ला झोकून दिले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. सदानंद फुलझेले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या दीक्षाभूमी येथे 3 ते 5 वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्य संस्कार संध्याकाळी 6 वाजता अंबाझरी घाट येथे होतील.