नागपूर - जागतिक दर्जाचे नागपुरातील एक वैभव असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. कामठी येथे सुरू असलेल्या या कामाची पाहणी पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. यावेळी सेंटरचे काम ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास नेण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांशी सपंर्क साधा -
जागतिक दर्जाच्या या वास्तूचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन येत्या काही महिन्यात करण्याचा मानस असल्याने या बांधकामाला गती देण्यात यावी. तसेच कन्व्हेंशन सेंटरमध्ये कार्यालये सुरु करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांशी सपंर्क साधावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, नासुप्रच्या अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, प्रकल्प वास्तुशिल्पकार संदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
नियोजनात पार्कींग सुव्यवस्थेवर भर द्यावा -