नागपूर- पदव्युत्तर जागांबाबत सरकार अध्यादेश काढत असेल आणि ओपन मेरिट विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असेल तर पुन्हा न्यायालयात दाद मागणार, मात्र ओपन मेरिट विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसेल तर या निर्णयाचे स्वागत करू. तसेच सरकारची सर्व समाजाप्रती न्यायिक भावना असायला पाहिजे. या मुद्दयांवर राजकारण व्हायला नको, असे मत मराठा आरक्षण संदर्भात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते डॉ. अनिल लध्धड यांनी व्यक्त केले आहे.
सरकारची सर्व समाजाप्रती न्यायिक भावना असायला हवी - डॉ. अनिल लध्धड
वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे २५० मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता. आचारसंहिता सुरू असल्याने सरकारचीदेखील कोंडी झाली होती.
सरकारची सर्व समाजाप्रती न्यायिक भावना असायला पाहिजे - डॉ. अनिल लध्धड
वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे २५० मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा पेच निर्माण झाला होता. आचारसंहिता सुरू असल्याने सरकारचीदेखील कोंडी झाली होती. यासाठी अध्यादेश काढून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली होती. या विषयावर डॉ. अनिल लध्धड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.