महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एचटीबीटी प्रकरणात शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे आदेश - accused

एचटीबीटी बियाणांबाबात राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कुलगुरुंकडून अहवाल मागितला असून त्यावर सरकार निर्णय घेणार आहे, असे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

By

Published : Jul 6, 2019, 10:34 AM IST

नागपूर- बंदी असलेल्या एचटीबीटी बियाणांच्या लागवड प्रकरणात विदर्भात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घ्या, तसेच भविष्यात एचटीबीटी बियाणे लागवड प्रकरणात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नका, असे आदेश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले आहेत. या बियाणांबाबात राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कुलगुरुंना अहवाल मागितला असून त्यावर सरकार निर्णय घेणार आहे, असेही ते म्हणाले.

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना

येत्या महिनाभरात कृषी सहाय्यकांची पदे भरणार असून, आता कृषी सहाय्यकांना गावात जाणे बंधणकारक आहे. तसेच खतांचा काळाबाजार किंवा बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, असल्याचेही बोंडे यांनी सांगितले. तर नागपूर विभागात यंदा सरासरीच्या ७३ टक्केच पाऊस पडल्याने आतापर्यंत ३५ टक्केच पेरण्या झाल्याची माहिती त्यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details