महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष..! बालाघाटची डॉक्टर कन्या दुचाकीने प्रवास करत नागपूरात रुग्णांच्या सेवेत दाखल - बालाघाट डॉ. प्रज्ञा बातमी

डॉ. प्रज्ञा घरडे यांनी नागपूरातील बिकट परिस्थिती बघता सुट्टीवर असतानाही रुग्णसेवेसाठी नागपूर गाठले आहे. काही दिवसांपूर्वी त्या मूळगावी गेल्या होत्या. परंतु काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची परिस्थिती बिटक होत चालली आहे. अशात परिस्थितीत त्यांना रूग्णसेवा देण्याकरिता बोलवण्यात आले. त्यानंतर डॉ. प्रज्ञा घरडे यांनी चक्क दुचाकीने 180 किमीचा प्रवास करण्याचे ठरवले.

balaghat doctor news
नागपूर

By

Published : Apr 22, 2021, 9:32 PM IST

Updated : Apr 27, 2021, 5:43 PM IST

नागपूर - बालाघाट येथील डॉ. प्रज्ञा घरडे यांनी नागपूरातील बिकट परिस्थिती बघता सुट्टीवर असतानाही रुग्णसेवेसाठी नागपूर गाठले आहे. बालाघाट ते नागपूर असा प्रवास करताना त्यांना काय अडचणी आल्या. त्यांचा हा प्रवास कसा होता. या संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट.

बालाघाटची डॉक्टर कन्या दुचाकीने प्रवास करत नागपूरात रुग्णांच्या सेवेत दाखल

दुचाकीने 180 किमीचा प्रवास -

बालाघाट येथील डॉ. प्रज्ञा घरडे या नागपूरातील खाजगी रुग्णलायत निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी त्या मूळगावी गेल्या होत्या. परंतु काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची परिस्थिती बिटक होत चालली आहे. नागपूरात अनेक ठिकाणी डॉक्टरांचेही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. अशात परिस्थितीत त्यांना रूग्णसेवा देण्याकरिता बोलवण्यात आले. मात्र, मध्यप्रदेशमध्ये लॉकडाऊन असताना नागपूरमध्ये यायचे कसे, अशी अडचण त्यांच्यापुढे निर्माण झाली. त्यानंतर डॉ. प्रज्ञा घरडे यांनी चक्क दुचाकीने 180 किमीचा प्रवास करण्याचे ठरवले. त्यांच्या या निर्णयाला घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला. परंतु त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली. नागपूरात दाखल होताच त्यांनी रुग्णालयात दाखल होत त्यांनी आपली सेवा द्यायला सुरुवात केली.

रुग्णसेवा देताना करावा लागतो अनेक अडचणींचा सामना -

सद्या डॉ. प्रज्ञा घरडे या 12 तासांच्या शिफ्टमध्ये कोविड रुग्णालयात सेवा देत आहेत. यात रुग्णसेवा देताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही दिवस केवळ संध्याकाळच्या एक वेळ उपाशी राहण्याचीदेखील त्यांच्यावर वेळ आली होती. डॉ प्रज्ञा घरडे सारखे अनेक डॉक्टर आपल्या जीवाची परवा न करता आहोरात्र रूग्णसेवा देत जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे.

हेही वाचा - नाशिक : ऑक्सिजनसह रेमडेसिवीर तुटवड्याला केंद्र सरकार जबाबदार - पालकमंत्री

Last Updated : Apr 27, 2021, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details