नागपूर -विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) हे विरोधी पक्षाला सभागृहात बोलू देत नाहीत. सभागृहाच्या कामकाजात सहभागी करून घेत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव ( No confidence motion against Rahul Narvekar ) दाखल करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी दिली आहे. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास आणायचा असेल तर 29 आमदारांच्या (NCP Shivsena Congress on No confidence motion) सह्या लागतात.
आमच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही- आम्ही मात्र 47 आमदारांच्या सह्या प्रस्तावावर केल्या आहेत. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव सह्या घेऊन दाखल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांच्या सह्या नाहीत. मात्र, या आमदारांच्या जोरावर नियमाप्रमाणे त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे असे पटोले यांनी सांगितलं. आमच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही. मात्र, ते उपस्थित होऊ शकले नाहीत, असं पटोले यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.