नागपूर - आर्थिक फसवणूक केल्यामुळे महाठग अजित पारसेचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. सदर प्रकरणामध्ये आरोपीविरुद्ध प्रत्यक्ष सहभाग आणि रक्कमेबाबत देवाण घेवाण केल्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज खारीज केला जावा अशी मागणी सरकारी पक्षाने न्यायालयात मांडली होती. ती मागणी ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला. गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांच्या तावडीतून मोकाट असलेल्या महाठग अजित पारसेने अनेकांना कोट्यवधी रुपयांने गंडा घातला आहे. मात्र अजित पारसेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
सीबीआय चौकशीची बतावणी करत उकळले कोट्यवधी रुपयेया प्रकरणातील तक्रारदार डॅाक्टर राजेश मुरकुटे यांना मेडीकल कॅालेजची परवानगी प्राप्त करुन देण्याचे आमिष पारसेने दिले होते. त्याचप्रमाणे सीबीआयकडून तुमची चौकशी सुरु असल्याचे सांगून वेळोवेळी ४ कोटी ३६ लाख रुपयाची मुरकुटे यांची फसवणूक केली. डॉक्टर मुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीवरुन आरोपी अजित पारसे विरुद्ध अनेक कलमांतर्गत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अजित पारसे गंभीर आजारी असल्याने पोलिसांनी त्याला अद्यापही अटक केली नाही, हे विशेष
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा निकटवर्तीयसत्ताधारी तसेच विरोधकांसह विविध राजकीय पक्षातील लहान-मोठ्या नेत्यांच्या अजित पारसे हा फार जवळचा असल्याचे बोलले जाते. तसेच तो सोशल मीडियाचा इन्फल्यूएन्सर म्हणून मिरवतो. अजित पारसे विरुद्ध नागपूर शहर पोलिसांनी साडेचार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. अजित पारसेने एका होमिओपॅथी डॉक्टरला होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल साडेचार कोटी रुपये उकळले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने कोतवाली पोलीस ठाण्यात अजित पारसे विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सध्या अजित पारसेची तब्येत अजूनही नाजूक आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.