महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांना पीपीई किटचे वाटप - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वाढदिवस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांना संरक्षण कवच म्हणून पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले. ७०० किटपैकी वैद्यकीय महाविद्यालयाला ३००, मेयो रुग्णालयाला ३०० आणि डागा रुग्णालयाला १०० किट्स देण्यात आले.

ppe kit distribution
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांना पीपीई किटचे वाटप

By

Published : May 27, 2020, 7:55 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे आज नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि डागा रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांना ७०० पीपीई किट्सचे निःशुल्क वाटप करण्यात आले. यावेळी नागपुरातील भाजपचे आमदार उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांना पीपीई किटचे वाटप

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे. मात्र, नागपूरसह सर्वत्र कोरोनाचे संकट असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा करू नका, अशी सूचना केली होती. स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा न करता सामाजिक दायित्व म्हणून, कोरोनाच्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या कोरोना योद्ध्यांना संरक्षण कवच म्हणून पीपीई किट्सचे वाटप केले. ७०० किटपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ३००, मेयो रुग्णालयाला ३०० आणि डागा रुग्णालयाला १०० किट्स देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details