नागपूर- रागाच्या भरात एखाद्याचा संयम सुटतो आणि नकळत काहीतरी अपराध हातून घडतो, अशांच्या पाठीवर गुन्हेगारांचा शिक्का बसतो. परीस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळलेले अनेक कैदी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. पण, कारागृहात गेल्यानंतर त्या कैद्यांच्या परिजनांचे आणि मुलांचे हे खूप हाल होतात. एका गुन्हेगाराचा मुलगा किंवा मुलगी, असे काहीजण हिणवतात. अशा मुलांचे संगोपन आणि शिक्षण सुरळीत व्हावे, यासाठी बंदी कल्याण पुनर्वसन प्रकल्पांर्तग नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षणसेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप; राज्य कारागृह विभाग आणि टाटा ट्रस्टचा उपक्रम
कारागृहात गेल्यानंतर त्या कैद्यांच्या परिजनांचे आणि मुलांचे हे खूप हाल होतात. एका गुन्हेगाराचा मुलगा किंवा मुलगी, असे काहीजण हिणवतात. अशा मुलांचे संगोपन आणि शिक्षण सुरळीत व्हावे, यासाठी बंदी कल्याण पुर्नवसन प्रकल्पांर्तग नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षणसेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
यामध्ये बालवाडीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. राज्य कारागृह विभाग आणि टाटा ट्रस्टच्यावतीने मागील वर्षापासून हे उपक्रम राबविण्यात येत आहे. कैद्यांच्या मुलांना समाज देखील वाकड्या नजरेनी बघतो. परंतु, अनेक कैद्यांची मुले अभ्यासात हुशार आहेत. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यात येते आहे. या अंतर्गत सव्वाशे मुलांना वह्य़ा, पुस्तके आणि दफ्तरांचे वाटप करण्यात आले.