महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रस्ते विकासासाठी खूप कामे केलीत मात्र, अपघात कमी करण्यात मी अपयशी' - Nitin Gadkari Traffic Information

२०१८ मध्ये नागपूर जिल्ह्यात आणि शहरात अपघातांची संख्या ही ५८३ होती आणि २०१९ मध्ये ही संख्या ६३४ झाली. या अपघातांना आळा घालण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था काम करत आहेत. याविषयावर अधिक काम झाले पाहिजे, असे मत गडकरींनी व्यक्त केले आहे.

nagpur
कंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By

Published : Jan 11, 2020, 4:37 PM IST

नागपूर- रस्ते वाहतूक आणि लघू उद्योग मंत्रालयात खूप विकास कामे केलीत. मात्र, अपघाताची संख्या कमी होण्यात मी अयशस्वी झालो. यामध्ये समाधान म्हणजे तामिळनाडू या राज्यात २९% अपघात आणि ३०% मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी तामिळनाडू पॅटर्न कसा काम करतो याचे अध्ययन करण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया देताना कंद्रीय मंत्री नितीन गडकरी

२०१८ मध्ये जिल्ह्यात आणि शहरात अपघातांची संख्या ही ५८३ होती आणि २०१९ मध्ये ही संख्या ६३४ झाली. या अपघातांना आळा घालण्यासाठी अनेक समाजसेवी संस्था काम करत आहेत. या विषयावर अधिक काम झाले पाहिजे, असे मत गडकरींनी व्यक्त केले आहे. जगात सर्वाधिक अपघात भारतात होतात आणि वाहतूक परवाना जगात कुठे सहजासहजी मिळत असेल तर तो आपला देश आहे. एका राज्यात ३ वेगवेगळ्या जागी परवाना घेतला जातो. त्याला उपाय म्हणून आता ई-लार्निंगमध्ये सगळी परीक्षा ऑनलाईन होणार आहे. या परीक्षेत अभिनेता असो अथवा नेता, पास झाला तरच त्याला परवाना मिळेल. सोबतच अपघात टाळण्यासाठी ज्या संस्था काम करतात त्यांचा सत्कार करू, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा-ट्रक-बस जाळण्यापेक्षा स्वतःचे विचार ज्वलंत करा - उपराष्ट्रपती

ABOUT THE AUTHOR

...view details