महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Controversy of Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्यांची महाराष्ट्राने केली पोलखोल, एकच सवाल चमत्कार कधी दिसणार

बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे लोकांचे मन वाचतात असा दावा केला डातो धामच्या दैवी दरबारात एकदा अर्ज केला की नशीब बदलते असा लोकांचा समज आहे. बाबा लोकांच्या समस्या कागदावर सोडवतात आणि याच कृतीला महाराष्ट्रात आव्हान देण्यात आले आणि हा वाद चिघळला आहे. त्यावर आता अनिस आणि बाबा एकमेकांना आव्हान देत आहेत. आता खरच चमत्कार दिसणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. (Controversy of Bageshwar Dham )

Pandit Dhirendra Krishna Shastri
पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री

By

Published : Jan 19, 2023, 4:59 PM IST

Updated : Jan 19, 2023, 7:41 PM IST

बागेश्वर धामचा वादावर शाम मानव

नागपूर :गेल्या आठवड्यात ५ ते १३ जानेवारी दरम्यान नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर बागेश्वर धामचे कथाकार धीरेंद्र कृष्णशास्त्री यांच्या रामकथा पाठचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा मुक्काम नागपुरात नऊ दिवस होता असे सांगण्यात आले होते. त्यांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी आणि रामकथा ऐकण्यासाठी देशाच्या अनेक भागातून लोक आले होते.

कागदावर सोडवतात प्रश्न : धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री लोकांचे मन वाचत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामच्या दैवी दरबारात एकदा अर्ज केला की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे. महाराज लोकांच्या समस्या त्यांना न सांगता वाचून घेतात आणि नंतर त्यांचे मन सांगतात आणि लवकरच तुमची समस्या दूर होईल असे कागदावर सोडवतात. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात असलेले बागेश्वर धाम सरकार हे सिद्ध स्थान देशभर प्रसिद्ध झाले आहे. मोठ्या संख्येने लोक बागेश्वर धामच्या दरबारात पोहोचून अर्ज करतात. पण बाबांना लोकांचे मन कसे कळणार हा मोठा प्रश्न आहे.

बागेश्वर धामचा वादावर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री

अनिसचे आव्हान : धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख देऊ असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आले होते. आता पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रीं यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन स्वीकारले. रायपूर छत्तीसगड मध्ये 20 आणि 21 जानेवारीला बागेश्वर धामकडून दिव्य दरबार भरवला जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली आहे. तर नागपुरच्या रेशीमबाग मैदानावर सात दिवसच रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. कथा पूर्ण करून पुढच्या प्रवासाला निघालो. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वाद निर्माण केला. मी कथा सोडून पळालेलो नाही. मी तिथे होतो तेव्हा ते कार्यकर्ते का आले नाहीत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

तक्रार दाखल पण कारवाई नाही :अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दाव्याच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी तक्रारीचा अर्ज घेतला आहे पण या प्रकरणात काहिही केलेले नाही. शाम मानव यांनी या संदर्भात बोलताना पुन्हा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आव्हान स्विकारावे आणि 30 लाखाचे बक्षिस स्विकारावे हे सांगताना. या प्रकाराबाबत तक्रार केलेली असताना काहीही कारवाई न झाल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान दुसरीकडे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थही लोक पुढे येताना पहायला मिळत आहेत.


इथून सुरू झाला वाद :रामकथा सुरू असताना धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी अनेकांना त्यांच्या व्यासपीठावर आमंत्रित केले. त्यानंतर त्या व्यक्तीने काहीही सांगण्याच्यापूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी व्यासपीठावर आलेल्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या आणि प्रश्न एका कागदावर लिहून काढल्या इथूनच खरा वाद सुरू झाला. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने' अंधश्रद्धेचा खेळ सुरू केला असा आरोप श्याम मानव आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. श्याम मानव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर न देताचं पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्रीचा निर्धारित दौरा नऊ दिवसांच्या होता तो दोन दिवस आधीच गुंडाळून नागपुरातुन काढता पाय घेतला असे आरोप सुरू झाले.



काय आहे नेमके आरोप :मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारताचं नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. नागपुरात रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला. 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. या शिवाय देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक होत असून, महाराजांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे केली आहे.तरश्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना आवाहन दिले आहे. त्यांनी आमच्यामध्ये दैवी चमत्कारी दरबार आयोजित करावा सर्व सत्य सांगाल तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये भेट देऊ. त्यांचे आवाहन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकार केले आहे.



धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचे उत्तर :पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वादवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहे की गेल्या सात दिवसांपासून ते नागपुरात राम कथा आयोजित होती. त्यादरम्यान कोणीही आव्हान दिले नाही. मात्र कथेवरून परत येताच सनातन धर्माच्या विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपावर सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'हाथी चले बाजार कुत्रा भोंके हजार' असे उत्तर दिले आहे. तर बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींच्या रामकथेला भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा :Nagpur News श्याम मानव यांच्या कार्यक्रमात हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ दिले जय श्रीरामचे नारे

Last Updated : Jan 19, 2023, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details