नागपूर :धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख देऊ असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आले होते. आता पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रीं यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन स्वीकारले. रायपूर छत्तीसगड मध्ये 20 आणि 21 जानेवारीला बागेश्वर धामकडून दिव्य दरबार भरवला जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली आहे. तर नागपुरच्या रेशीमबाग मैदानावर सात दिवसच रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. कथा पूर्ण करून पुढच्या प्रवासाला निघालो. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वाद निर्माण केला. मी कथा सोडून पळालेलो नाही. मी तिथे होतो तेव्हा ते कार्यकर्ते का आले नाहीत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
बाबांवर आरोप काय? : मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारताचं नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. नागपुरात रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला. 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. या शिवाय देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक होत असून, महाराजांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे केली आहे. तर श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना आवाहन दिले आहे. त्यांनी आमच्यामध्ये दैवी चमत्कारी दरबार आयोजित करावा सर्व सत्य सांगाल तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये भेट देऊ. त्यांचे आवाहन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकार केले आहे.
कथेला भक्तांची गर्दी :गेल्या आठवड्यात ५ ते १३ जानेवारी दरम्यान नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर बागेश्वर धामचे कथाकार धीरेंद्र कृष्णशास्त्री यांच्या रामकथा पाठचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा मुक्काम नागपुरात नऊ दिवस होता असे सांगण्यात आले होते. त्यांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी आणि रामकथा ऐकण्यासाठी देशाच्या अनेक भागातून लोक आले होते.