नागपूर- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना समन्स बजावले होते. त्यावर आज सुनावणी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या सुनावणीवेळी फडणवीस न्यायलयात उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - खून करून 'ती' गेली पोलीस ठाण्यात; गुन्हाची दिली कबूली
विधानसभा निवडणुकीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सत्र न्यायालयात खटला चालविण्याचे आदेश दिले होते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.
हेही वाचा - डॉ. रुपा कुलकर्णी : असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी सावित्रीची लेक
यानंतर अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंठपीठाने निकाल दिला होता. त्यानुसार नागपुरात प्रथम श्रेणी न्यायलयाने फडणवीस यांना समन्स बजावले होते. शनिवारी या प्रकरणी सुनावणी आहे. या प्रकरणी यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी आपल्या वकिलांमार्फत काही कारणांसाठी गैरहजर राहण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळे आता यावेळीही फडणवीस न्यायलयासमक्ष हजर राहणार की त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे वकील बाजू मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.