नागपूर-विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयू वार्डची पाहणी देखील फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमधील कोव्हिड रुग्णालयाला भेट; रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद - nagpur latest news
देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या काही कोरोनाबाधित रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. नव्याने उभारलेल्या आयसीयू वार्डची पाहणी त्यांनी केली.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या काही कोरोना रुग्णांशींही यावेळी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली.
विधानपरिषदेसाठी भाजप कडून उमेदवारी प्राप्त झालेले भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके हे देखील यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपस्थित होते. विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहोचले. पुढील काही दिवस ते नागपुरात राहणार असल्याची माहिती आहे.