महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत प्रशासन पोहोचवण्याचा प्रयत्न करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. मतदारसंघात जाऊन ते आढावा बैठक घेत आहेत. त्याचप्रमाणे शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Fadnavis tour of Nagpur
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : May 19, 2023, 4:38 PM IST

Updated : May 19, 2023, 5:58 PM IST

प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, ज्या-ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, त्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये जाऊन तालुक्याची आढावा बैठक घेत आहे. ज्या काही शासकीय योजना आहेत, त्यासर्व शासकीय योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहचली पाहिजे. त्या योजनांना गती आली पाहिजे, त्यासाठी हा आढावा घेत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत होते. देवेंद्र फडणवीस आज 4 मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. उद्या पुन्हा दोन मतदारसंघाचा आढावा घेणार असून सगळे तालुके, सगळ्या नगरपालिका यात कव्हर करणार असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.


प्रशासन करणार 'या' साठी प्रयत्न: जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघावर विशेष भर नाही. हिंगणा आणि रामटेक मतदारसंघात जाणार आहे. तिथे आमचे आमदार आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आम्ही प्रशासन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत, ते आमचे कामच आहे, ते आम्ही करू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


जिल्ह्यात आम्ही प्रशासन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जल संधारणात महाराष्ट्र प्रथम: जलसंधारणामध्ये लोकांचा रस वाढत आहे. जलयुक्त शिवारमुळे 2018- 2019 या वर्षात महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर होता. कोराडी येथे नवीन ऊर्जा प्रकल्प युनिटला तीव्र विरोध होत आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऊर्जा निर्मितीचे सब क्रिटिकल प्लांट जे जुने प्लांट आहेत, ते प्रदूषण करतात आणि सुपर क्रिटिकल प्लांट हे प्रदूषण करत नाही. त्यांच्या जागी नवे आले पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे.



भाजपात मंत्रिपदासाठी पैसे लागत नाही: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे स्वीय सहायक असल्याची बतावणी करत राज्यातील 4 आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न उघड झाला आहे. पोलिसांनी आरोपीला गुजरात येथून अटक केली. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, काही लोक अशा प्रकारचा प्रयत्न करत होते. तेव्हा आमच्या आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांना ट्रॅप केले. आमच्या आमदारांना माहिती आहे की, भाजपमध्ये मंत्री बनायला पैसे लागत नाही.

आमच्या आमदारांना माहिती आहे की, भाजपमध्ये मंत्री बनायला पैसे लागत नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis on BMC corruption उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली असून पोपटही मेलादेवेंद्र फडणवीस
  2. Devendra Fadnavis On Bullock Cart Races बैलगाडी शर्यतीचा निकाल म्हणजे शेतकऱ्यांचा विजय फडणवीस
  3. J P Nadda Pune Visit मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे नाव एकत्र कोणी घेत नाही जे पी नड्डा
Last Updated : May 19, 2023, 5:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details