महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय राऊत यांची विकृत मानसिकता झळकली; ‘त्या’ फोटोवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया - Devendra Fadnavis slams Sanjay Raut

Devendra Fadnavis : संजय राऊत यांनी एका कॅसिनोचा फोटो ट्विट केलाय. या ट्विट केलेल्या फोटोमुळे राजकारणात नवा वाद निर्माण झालाय. या फोटोवर भाजपाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणावरुन संजय राऊत यांच्यावरच सडकून टीका केलीय.

Devendra Fadnavis slams Sanjay Raut
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 7:18 PM IST

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस

नागपूर Devendra Fadnavis: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) कुटुंबासह मकाऊ येथे फिरायला गेले आहेत. त्यावेळी ते कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा फोटो संजय राऊत यांनी 'एक्स'वर अपलोड केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी बावनकुळेंचा बचाव केलाय. संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून झळकत आहे. ते किती डेस्परेट झाले आहेत हे यावरुन लक्षात येत आहे, असं फडणवीस म्हणाले.

अशाप्रकारची विकृत मानसिकता संपली पाहिजे: चंद्रशेखर बावनकुळे संपूर्ण कुटुंबासह ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्यांनी तेथे जेवण केलं. त्या रेस्टॉरंटच्या बाजूला कॅसिनो आहे. त्यांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केला. जर पूर्ण फोटो ट्विट केला असता तर सत्य बाहेर आलं असतं. बावनकुळे यांच्या फोटोत त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे. त्यामध्ये पत्नी, मुलगी, नातू आहे. अशाप्रकारची विकृत मानसिकता संपली पाहिजे. राजकारणात इतकं फस्ट्रेशन योग्य नाही. यापेक्षा वाईट पातळी काय असू शकते. मॉर्फ केलेले फोटो टाकणे म्हणजे राजकारणाची पातळी खाली घेऊन जाणे आहे.

पोलीस गृहमंत्र्याला विचारून निर्णय घेत नाहीत: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना चौकशी समितीने क्लीन चिट दिलेली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, कुठे बळाचा वापर करायचा असेल, कुठे लाठीचार्ज करायचा असेल अशा ठिकाणी त्या ठिकाणचे पोलीस प्रमुख त्या वेळची परिस्थिती बघून निर्णय घेत असतात. ते काही पोलीस दल प्रमुख किंवा गृहमंत्र्याला विचारून निर्णय घेत नाहीत. यामध्ये नवीन काही आहे असं काही नाही, जे सत्य होतं तेच बाहेर आलं आहे.

हेही वाचा -

  1. रेस्टॉरंट आणि कसिनो एकच; राऊतांच्या पोस्टवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण
  2. महाराष्ट्राच्या राजकारणातलं द्युत; राऊतांनी पोस्ट केला बावनकुळेंचा जुगार खेळतानाचा फोटो, आणखी २७ फोटोंसह ५ व्हिडिओ असल्याचा दावा
  3. राष्ट्रवादी खरी कोणाची? निवडणूक आयोगात आजपासून तीन दिवस होणार सुनावणी, शरद पवार राहणार हजर

ABOUT THE AUTHOR

...view details