महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंगालमध्ये लोकशाहीची हत्या झाली - फडणवीस - देवेंद्र फडणवीस बातमी

बंगालमध्ये आज (दि. 4 मे) लोकशाहीची हत्या आहे. लोकशाहीला काळीमा फासणारी ही परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : May 4, 2021, 8:28 PM IST

नागपूर - बंगालमध्ये आज (दि. 4 मे) लोकशाहीची हत्या आहे. लोकशाहीला काळीमा फासणारी ही परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहे. कार्यकर्त्यांची घरे जाळली जात आहेत. महिलांसोबत दुरव्यवहार केले जात आहे ही भयानक परिस्थिती बंगालमध्ये आहे. ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

बोलताना देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की, मला आश्चर्य वाटते स्वतःला पुरोगामी म्हणून सकाळपासून माध्यमांसमोर येणारे नेते यावर एकही शब्द बोलत नाही. साधा निषेध करायला तयार नाही, यामुळे या हिंसाचाराला समर्थन आहे का, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details