नागपूर - अवकाळीग्रस्तांना हेक्टरी २५ हजारांची मागणी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. तेव्हा याचा विचार करून २५ हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये विरोधी पक्षाच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.
सरकारवर टीका करताना ते म्हणाले, हे सरकार आल्यानंतर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती. आम्ही काळजीवाहू सरकारमध्ये असताना १० हजार कोटींची मान्यता दिली होती. ही केवळ आकस्मिक मदत आहे. पुढच्या टप्प्यात ही मदत वाढवली जाईल, असे आम्ही सांगितले होते. राज्यपालांनीही मदतीची घोषणा केली होती. मात्र सरकारने अद्यापही त्याची अंमलबजावणी केली नाही. हेक्टरी २५ हजारांची मागणी करण्यात आली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी २५ हजार रुपये हेक्टरी मदत करावी. मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या, मात्र अवकाळीग्रस्तांच्या समस्येसंदर्भात चर्चाही झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. जवळजवळ ९३ हेक्टर लक्ष पीकांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकार गंभीर नाही, असा आरोप त्यांनी केला. तिन्ही पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्या संदर्भातील त्याचा कार्यक्रम जाहीर करावा, असे ते म्हणाले.
हेक्टरी २५ हजारांची मदत तत्काळ करावी, फडणवीसांची मागणी - devendra fadnavis press live
हेक्टरी २५ हजारांची मागणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी केली होती. तेव्हा याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी २५ हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सरकारवर टीका करताना ते म्हणाले, हे सरकार स्थगिती सरकार आहे. विविध कामांना सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे कामे ठप्प झाली आहेत. याचा गुंतवणुकीवरही परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय पेयजल योजनेचे कामही तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या सरकारमधील प्रत्येक कॅबिनेट निर्णयात शिवसेना सहभागी होती. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी ते निर्णय कसे चुकीचे होते हे शिवसेनेकडून वदवून घेतले जात आहे. सहा दिवसांच्या अधिवेशनात मंत्रीच नाही, विषय नाहीत तरीदेखील आम्हला जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत, प्रश्न मांडू दिले नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.