महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : इतर राज्यांनी लागू केलेल्या लव्ह जिहादवरील कायद्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीस

विधान सभेत लव्ह जिहाद बाबतच्या कायद्यांचा मुद्दा जोरात गाजला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य ( Devendra Fadnavis over Love Jihad ) केले. इतर राज्यांनी लागू केलेल्या "लव्ह जिहाद" बाबतच्या कायद्यांचा अभ्यास करून राज्य सरकर महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करेल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. याबाबत अनेक नेत्यांनी आपली मते मांडली आहेत.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 21, 2022, 10:07 AM IST

नागपूर : महाराष्ट्र सरकार इतर राज्यांनी तयार केलेल्या "लव्ह जिहाद" बाबतच्या कायद्यांचा अभ्यास करून योग्य तो निर्णय ( other states love jihad law study require ) घेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ( Devendra Fadnavis over Love Jihad ) आहे. श्रध्दा वालकर प्रकरणानंतर सभागृहात राज्यात लव्ह जिहादची उदाहरणे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. अशी भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे, असे राज्य विधिमंडळाच्या संकुलात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले.

लव्ह जिहादबाबत परराज्यातील कायद्यांचा अभ्यास :"लव्ह जिहाद" चा अर्थ मुस्लिम पुरुषांनी हिंदू स्त्रियांना लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतरण करून घेणे असा उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. “आम्ही सभागृहाला आश्वासन दिले आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये लव्ह जिहादबाबत कायद्यांचा अभ्यास करू. सरकार योग्य तो निर्णय घेईल जेणेकरून कोणत्याही कारणामुळे महिलेला किंवा मुलीला त्रास होऊ नये, असे फडणवीस यांनी म्हटले आहेत. ‘लव्ह जिहाद’वर कठोर कायदा करण्याची मागणी आहे. राज्य सरकारचा आंतरधर्मीय विवाहांना विरोध नाही. पण या विवाहांनंतर कालांतराने हे लक्षात आले की हा एक षड्यंत्राचा भाग आहे. काही जिल्ह्यांमध्ये असे विवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत,” ते म्हणाले.

पोलिसांवर राजकीय दबाव ? : भाजपचे आमदार अतूल भातखळकर आणि आशिष शेलार यांनी श्रद्धा वालकर यांच्या हत्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. श्रद्धा वालकरने तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला विरुद्ध नोव्हेंबर 2020 मध्ये वसई पोलिसांत दाखल केलेली छळाची तक्रार मागे घेतली. तक्रार मिळाल्यावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव होता का? असा प्रश्न उपस्थित केला. अमरावतीचे फार्मासिस्ट उमेश कोल्हे मारले गेले या घटनेचाही यावेळी दाखला देण्यात आला.

आंतरधर्मीय विवाह समिती :देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आंतरधर्मीय विवाह समिती स्थापन ( Interfaith Marriage Committee ) करण्यात येणार असल्याचे सांगितले. ही समिती विवाहित जोडपे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नोंदी ठेवेल. असे सांगितले. श्रद्धा वालकरच्या वडिलांनी. या घटने त्यांना ज्या समस्या वाटल्या त्या मांडल्यानंतर अशा पालकांच्या समस्या सुटतील असे म्हटले.राज्य विधिमंडळाच्या संकुलात पत्रकारांशी बोलताना सपा आमदार अबू असीम आझमी यांनी यावर त्याचे मत ( Abu Azmi allegation Interfaith Marriage Committee) मांडले. वालकरचा खटला हा लव्ह जिहादचा मुद्दा नाही कारण तो रंगवला जात आहे. त्याऐवजी हा एक सामाजिक आणि लिव्ह-इन रिलेशनशिपचा विषय होता," असे ते पुढे म्हणाला. या घटनेला लव्ह जिहाद म्हणून संबोधून लोकांची दिशाभूल केली जात आहे," तो म्हणाला. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी आंतरधर्मीय विवाह तपासणी समितीची स्थापना हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा आरोप आझमी यांनी ( Hindus Muslims divide attempt ) केला.

ABOUT THE AUTHOR

...view details