नागपूर - आज (शनिवार) पहाटे भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील लहान बालकांच्या अतिदक्षता कक्षाला (SNCU) भीषण आग लागली. त्यामध्ये १० नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक आहे. आपल्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईवरून नागपूरला आल्यानंतर फडणवीस भंडाऱ्याला रवाना झाले.
राज्यातील सर्व आरोग्य व्यवस्था आद्ययावत असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, भंडारा येथील घटनेने सर्व पोकळ दाव्यांची सत्यता उघड झाल्याची टीका फडणवीस यांनी केली. भंडारा येथील घटनेची उच्च स्तरीय चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
फायर ऑडिट का झाले नाही?