नागपूर :महाविकास आघाडी अडीच वर्ष सत्तेत होती, त्यावेळी त्यांनी एकही विकासाचे काम केलेले नाही. आम्ही मात्र, सतत काम करत आहे. मविआच्या घोषणापत्रामध्ये यांनी एका रुपयात क्लिनिकची घोषणा केली होती. मात्र, अडीच वर्षात एकही क्लिनिक यांनी सुरू केले नाही. आम्ही काल साडे तीनशे बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाने आम्ही सुरू केले. हे फक्त बोलणारे, तोंडाची वाफ काढणारे लोक आहेत, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : बाबरी पडत होती तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते ते सांगावे- देवेंद्र फडणवीस
सोमवारी मुंबईत झालेली महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा अरूणोदय आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे. सत्ता गेल्याने महाविकास आघाडीचे नेतेगण निराश झाले आहेत, किंबहुना ते बावचळलेले आहेत. त्यांचा तोल गेला आहे. त्यांच्या बोलण्याला किती गांभीर्याने घ्यायचे? हा देखील प्रश्नच असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते सोमवारपासून गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत.
बारसु रिफायनरीला स्थानिकांचा पाठिंबा :बारसु रिफायनरी विरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाला मुळात स्थानिकांचा पाठिंबा नाही. बाहेरच्या लोकांचे आंदोलन सुरू आहे. विरोधकांपेक्षा स्थानिकांचा रिफायनरीला पाठिंबा जास्त आहे. काहींचा तिथे काही वाईट चित्र निर्माण करून राज्याची, सरकारची बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे राजकीय पोळी भाजत आहे, यांचा दुहेरी चेहरा समोर आला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.काही लोकं गृह विभागाने आयडेंटिफाय केले आहे, जे लोकं वारंवार आंदोलनात असतात. आमच्याकडे असे रिपोर्ट्स आहे की, जे लोकं राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या गटाचा ही बारसुच्या आंदोलनात सहभाग असल्याचे समोर येत आहे.
आम्हाला हिंदुत्व शिकवू नये :जेव्हा काही लोकं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलण्याऐवजी बाळासाहेब ठाकरे बोलायला लागले आहे. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, त्यावर मी काहीच बोलणार नाही, आता यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावे, असे ते म्हणाले. बाबरी पडत होती, तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? हे त्यांनी आधी सांगावे. मी भाजपचा कार्यकर्ता बाबरी पडत होती, तेव्हा तिथे होतो. हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा एक कार्यकर्ता सांगावा. तुम्ही तर घरातून बाहेर पडले नाही. उद्धव ठाकरे हे जे मोठे मोठे वक्तव्य करतात. त्यांनी 'अपना गिरेबान मे झाक कर देखे' अशा शब्दात फडणवीसांनी उध्दव ठाकरेंवर आरोपांची सरबत्ती केली आहे.