'गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना माना, ही कसली सौदेबाजी?' -
गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना मानतो, ही कसली सौदेबाजी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला. आम्ही गांधी-नेहरुंना मानतो. तुम्हीही सावरकरांचा आदर करा, असे वक्तव्य राऊत यांनी राहुल गांधींना उद्देशुन केले होते.
नागपूर - गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना माना, ही कसली सौदेबाजी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला. आम्ही गांधी-नेहरुंना मानतो. तुम्हीही सावरकरांचा आदर करा, असे वक्तव्य राऊत यांनी राहुल गांधींना उद्देशुन केले होते. सावरकरांविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्य दुर्दैवी आहे. सावरकर त्यांना ठावून नाहीत. देशभर याचा निषेध होत आहे. केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. त्यामुळे शिवसेनेने किती दिवस लाचारी करायची याचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.