नागपूर - कोरोनाग्रस्तांना गृह अलगिकरण (होम आयसोलेशन) बंद करुन संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत असताना सरकारे असा निर्णय का घेतला हे समजत नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात सेवांकुर कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
वैज्ञानिक कारण सांगावे
गृह अलगिकरण बंद करण्यामागे सरकारचा काय हेतू आहे, यामागे नेकमे कोणते वैज्ञानिक कारण आहे, हे चर्चा करुन स्पष्ट करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पुण्याच्या महापौरांनी केला निर्णयाचा विरोधात
यात पुण्याचे माहापौर मोहोळ यांनी या होम आयसोलेशन बंद करण्याच्या निर्णयाला विरोध केला. कारण आता लाट ओसरली असताना आणखी कोविड केअर सेंटर नव्याने सुरू करण्यास अडचणी आहेत. यात सोयी-सुविधा, जेवणाची सोय, सुरक्षा रक्षक, वैद्यकीय सेवा कर्मचारी नियुक्त करण्यास अनेक अडचणी असल्याचे म्हटले. यासोबत गरज असल्यास करून सक्रिय रुग्ण घटले असताना या निर्णयाला विरोध केला आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह म्युकरमायकोसिसच्या प्रतिबंधासाठी जनजागृती; अधिकारी करणार गाव भेटी