नागपूर- राज्य सरकारचे रिमोट हे सिल्वर ओकवर असून त्या रिमोटची बॅटरी दिल्लीत आहे. त्यामुळे, या सरकामध्ये कोणच काही बोलत नाही, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
भाजपच्या कार्यकारणी मेळाव्यात ते बोलत बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, सत्तेमुळे काही लोकांची भाषा बदलली, डोक्यात सत्ता गेली आहे. सत्तेमुळे तुमचा रंग फिका पडत चालला आहे. त्यांच्या रंगावर दुसरे रंग चढत चालला आहे. तुमच्यात हिंमत असेल तर सीएएचे समर्थन करुन दाखवा, सावरकरांच्या मुद्द्यांवर भुमिका का नाही घेत, असे सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित केला आहे.