नागपूर -राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आज सकाळी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची बंद दारामागे सुमारे तासभर चर्चा झाली आहे. चर्चेचा विषय अद्याप अस्पष्ट असला तरी, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तिघांमध्ये चर्चा झाल्याने अनेक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मोहन भागवत यांची भेट महत्त्वाची -
नुकतच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत पार पडले. यामध्ये विरोधी पक्षाने सरकारवर केलेल्या आरोपांमुळे सरकार अडचणीत सापडलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार तीन महिन्यात कोसळणार किंवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार, या संदर्भातील वक्तव्य केले आहेत. या दोन्ही वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.