नागपूर- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी (दि. 20 मार्च) मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्रीअनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचे महिन्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर जो आरोप केला तो पहिल्यांदा झालेला नाही. यापूर्वीही पोलीस महासंचालक पदावर असतांना पोलीस विभागातील बदल्यांसाठी बदल्यांचे प्रकरणात सुबोधकुमार जयस्वाल यांनी एक अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला. त्यानंतर काहीच कारवाई झालाी नाही. अखेर त्यांनी सुबोधकुमार जयस्वाल सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीचे दोन वर्षे राहिले असताना केंद्राच्या सेवेत निघून गेले. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनीही अहवाल दिला पण काही झाले नाही.
...तर राज्यावर ही वेळ आली नसती
परमबीर यांनी त्यांच्या बदलीनंतर गृहमंत्र्यांवर आरोप केले. मात्र, हे पहिल्यांदा लागलेले आरोप नाही. तसेच हे चॅट त्यांची बदली होण्यापूर्वीचे आहे. त्यामुळे ते नाकारून चालणार नाही. सुबोधकुमार जयस्वाल आणि रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून कारवाई झाली असती तर राज्यावर ही वेळ आली नसल्याचेही फडणवीस म्हणाले.या अहवालानंतर पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तेव्हा काही फोन सर्विलेन्सवर लावले होते असेही ते म्हणालेत. यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र, काहीच करवाईन न झाल्याने त्या सुद्धा केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर निघून गेले.