नागपूर - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या (शुक्रवार) फेसबुकवरून साधलेल्या संवादावर जोरदार टीका केली आहे. त्याच्या भाषणात कोविड का वाढतोय, तो आपल्या महाराष्ट्रातच का वाढतोय त्यावर आम्ही काय उपाययोजना करतो आहे हे सांगण्याची गरज होती. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलबाजी कर, जे त्यांना सल्ला देतात त्यांना उत्तर दे यामध्येच संपूर्ण वेळ वाया घालवल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकार कोविड कमी करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेली - फडणवीस
लॉकडाऊन लागू केल्यास त्याकाळात काळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात हे सर्व मुद्दे कुठेच दिसून आले नसल्याचे फडणवीसांनी म्हणटले आहे.
हेही वाचा -अमेरिकेच्या कॅपिटोल हिलजवळ वाहनाने सुरक्षा रक्षकांना चिरडले; परिसर केला लॉकडाऊन
जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा आजार- फडणवीस
जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. कारण महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे ज्याने कोरोना काळात लॉकडाउन केल्यानंतर ही नागरिकांना कोणतीही मदत केली नाही. केंद्र सरकारने तर वीस लाख कोटींचा पॅकेज दिले होते. मात्र, महाराष्ट्र राज्याने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही. पंततप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केले होते तेव्हा प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती. त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या. प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोहोचेल अशी व्यवस्था केली होती. खात्यात पैसे जातील असे नियोजन केले होते. राज्य सरकारने पॅकेज न देता फक्त लोकांची वीज कापली, लोकांना त्रास दिल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.