महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीसांनी घेतली नाना पटोलेंसह उद्धव ठाकरेंची फिरकी

महाराष्ट्रतील सत्ता संघर्षावर उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. संजय राऊतांनी सकाळी कोणता आरोप केला, हे त्यांना संध्याकाळी आठवत नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis On Thackeray Shiv Sena
Devendra Fadnavis On Thackeray Shiv Sena

By

Published : Feb 17, 2023, 6:14 PM IST

Updated : Feb 17, 2023, 6:41 PM IST

देवेंद्र फडणवीस

नागपूर : सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार हे स्पष्ट झाले आहे. सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत स्पष्ट झाले. आजच्या निकालावर राज्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी करून उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.





उद्धव ठाकरेंच्या शिवसेना वेळ काढू धोरण : १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी सात सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला होता. फक्त नबाम रेबिया प्रकरणाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवा ही मागणी योग्य नव्हती. न्यायालयाने आम्ही मेरिटवर प्रकरणाची सुनावणी करू असे सांगितले आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना वेळ काढू धोरण राबवत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.





आजच्या निर्णयाने आम्ही समाधानी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विस्तारित घटनापिठाची मागणी केली होती. मात्र, आता अशी स्थिती नाही राहिली आहे. या प्रकरणाची नियमीत सुणावनी होणार असुन अंतिम निकाल लवकरच लागेल असे फडणवीस म्हणाले आहे. तसेच आजच्या निर्णयाने आम्ही समाधानी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर आज दिली आहे.






संजय राऊत काहीही आरोप करतात :संजय राऊत काही आरोप करू शकतात. ते दिवसातून तीन वेळेला आरोप करतात. संजय राऊतांनी सकाळी कोणता आरोप केला, हे त्यांना संध्याकाळी आठवत नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.




न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास : सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता २१ फेब्रुवारीला होणार आहे. सध्या हे प्रकरण ५ न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. अंतीम निकाल आमच्या बाजूनेच लागेल. न्यायालयाचा आजचा निकाल ठाकरे गटासाठी धक्काच असल्याचे सांगण्यात येत आहे.



मुख्यमंत्र्यांवर आपत्रतेची टांगती तलवार :१६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भात न्यायालयात सूनवाई सुरू आहे. न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र ठरवले तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अपात्र ठरतील. मग अशा वेळी त्यांनी घेतलेले सर्व निर्णय अडचणीत येणार असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.





उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे : सत्तासंघर्षाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिलेला निकाल कुणाला धक्का आहे. याबाबत मी वाच्यता करणार नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवनकुळे म्हणाले आहेत. आमचे सरकार भक्कम आहे. उद्या बहुमत सिद्ध करायला सांगितले तर, १८४ पेक्षा जास्त मते मिळतील असा दावा त्यांनी केला केला आहे. भाजप कुठल्याही निर्णयाला तयार आहे. पैसे देऊन कुठलंही सरकार बनत नाही. काग्रेसच्या काळात सरकारच बरखास्त केले गेले. आम्ही कधीही असे प्रयत्न केले नाही. आमदारांचे भविष्य धोक्यात होते म्हणुन आमदार शिंदे गटासोबत गेले. महाराष्ट्राचे सरकार गेल ते उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागण्यामुळे गेले आहे. ते खोक्याचे नॅरेटीव्ह सेट करत आहेत. आम्हाला माहित नाही का खोके कुणी घेतले. उद्धव ठाकरे यांनी अजूनही आत्मचिंतन करावे. सकाळचा भोंगा बंद करावा. नाही तर किंचीत सेनेत चारच लोक राहतील. गिरीश बापट यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे. यालाच संस्कार म्हणतात असे बवनकुळे म्हणाले आहेत.

Last Updated : Feb 17, 2023, 6:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details