महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत गोंधळ; कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी - pravin darekar winter session nagpur latest news

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा 'कायम' शब्द काढण्यात येणे, तसेच या सर्व शाळांना अनुदान देण्यासाठी तत्कालीन सरकारने ठरल्याप्रमाणे प्रथम वर्षाला 20 आणि द्वितीय वर्षाला 40 टक्के अनुदान मिळावे, याकरिता राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला होता.

pravin darekar
प्रविण दरेकर

By

Published : Dec 21, 2019, 8:26 PM IST

नागपूर - हिवाळी अधिवेशनाचा आज (शनिवारी) शेवटचा होता. यावेळी विरोधकांनी कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणीसाठी विधानपरिषदेत गोंधळ घातला. तसेच काही वेळाने सभागृहाचा त्याग केला.

सभागृहाचा त्याग केल्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा -विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस; शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा 'कायम' शब्द काढण्यात येणे, तसेच या सर्व शाळांना अनुदान देण्यासाठी तत्कालीन सरकारने ठरल्याप्रमाणे प्रथम वर्षाला 20 आणि द्वितीय वर्षाला 40 टक्के अनुदान मिळावे, याकरिता राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला होता. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. यानंतर गेल्या सरकारने टप्या-टप्याने अनुदानात 20 टाक्यांची वाढ केली जात आहे. मात्र, विरोधकांनी 40 टक्यांची मागणी केल्यानंतर परिषदेत गोंधळ उडाला. यानंतर विरोधकांनी सभागृहाचा त्याग केला.

ABOUT THE AUTHOR

...view details