नागपूर- जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने सापडणाऱ्या रुग्णांची संख्या आता दिवसाकाठी ५००च्या आत गेली आहे. फेब्रुवारीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. त्यामुळे रुग्णसंख्या ७८ हजारांच्या घरात पोहचली होती. मात्र, आता घटत्या रुग्णांच्या प्रमाणामुळे ही संख्या आता १२ हजारांवरपोहचली आहे.
रुग्ण नसल्याने अनेक बेड रिकामे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीनंतर टोपे यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी होम आयसोलेशन बंद करून सुपर स्प्रेडर बनून फिरणाऱ्यांच्या आता चाप बसणार आहे. यात सध्या रुग्णलायत रुग्ण नसल्याने अनेक बेड रिकामे झाले आहे. यामुळे कोविड सेंटरमध्ये संशयित किंवा बाधित रुग्णांना ठेवले जाणार आहे.
सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची रवानगी कोविड केअर सेंटरमध्ये
दुसऱ्या लाटेत रुगणालयातील परिस्थिती इतकी गंभीर झाली होती, की गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. यामुळे बरेचशे रुग्णांना घरात आयसोलेशनमध्ये राहावे लागले. एवढेच काय अनेक गंभीर रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सिजनवर उपचार घेण्याची वेळ आली. पण सध्या मे महिन्याच्या सुरवातीपासून सक्रिय रुग्ण आणि नव्याने बाधित रुग्णांची संख्या घटत गेली. पण याच काळात घरातील इतर रुग्ण हे औषध असो, की अन्य काही कामानिमित्त घराबाहेर फिरताना आढळून आले. यामुळे आता सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनासुद्धा कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
8 हजार 384 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
नागपूरात सध्याच्या घडीला रुग्णसंख्या पाहता 8 हजार 384 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे. यात 17 सीसीसी सेंटर नागपूरत शहरात आहे. तेच गृहविलगीकरणात 7512 रुग्ण सध्या घरात उपचार घेत आहे. यामुळे या रुग्णांना आता यानंतर कोविड सेंटरमध्ये राहावे लागणार नाही. पण नव्याने मिळणाऱ्या रुगांना आता मात्र, कोविड सेंटरमध्ये पाठवले जाणार आहे. पण सध्या घडीला कोरोनाची लाट ओसरल्याने या योजनेचा नेमका फायदा होईल का? हा प्रश्न आहे.