महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

‘रेमडेसिवीर’चे मूल्य निर्धारित करा - महापौरांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचे मूल्य निर्धारित करावे, अशी विनंती नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्राद्वारे केली आहे.

नागपूरांच्या महापौरांचे पत्र
नागपूरांच्या महापौरांचे पत्र

By

Published : Apr 11, 2021, 9:47 AM IST

नागपूर -महाराष्ट्रात विदर्भ आणि नागपुरात कोरोना जागतिक महामारीने कहर केला आहे. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिवीर हे इंजेक्शन रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. आवश्यक औषधीमध्ये याचा समावेश असून सामान्य लोकांना त्याची टंचाई भासत आहे. काळ्या बाजाराचाही फटका बसत असून या इंजेक्शनचे मूल्य निर्धारित करावे, अशी विनंती नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्राद्वारे केली आहे.

‘रेमडेसीवीर’चे मूल्य निर्धारित करा

महापौरांनी पत्रात नमूद केल्यानुसार, रेमडेसिवीरची किंमत सध्या १३०० रुपयांच्या आसपास आहे. टंचाईमुळे काळ्या बाजारात ते पाच ते सात हजार रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. या इंजेक्शनची किंमत डीपीसीओ अंतर्गत निर्धारित करण्यात आली तर, सामान्य लोकांना इंजेक्शन सहज आणि सुलभ उपलब्ध होईल. शिवाय आर्थिक बोजाही त्यांच्यावर पडणार नाही. ज्याप्रमाणे मास्क आणि सॅनिटायझरची किंमत निर्धारित करून सर्व देशवासीयांना मदत करण्याचे कार्य केले. त्याचप्रमाणे जीवनावश्यक इंजेक्शनची किंमत निर्धारित करून सामान्य आणि रुग्णांना दिलासा द्यावा, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रात म्हटले आहे.

डॉक्टरांनीही सामान्यांना दिलासा द्यावा....

सध्या कोरोनावर उपचारासाठी जो औषधोपचार केला जातो. त्याची किंमत चार हजारांच्यावर आहे. यात ८०० ते ९०० रुपयांची औषधेही उपलब्ध आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व सामान्य रुग्णांचा विचार करुन कमी किंमतीची औषधे लिहून द्यावीत आणि सामान्यांना कोव्हिडकाळात दिलासा द्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले. शुक्रवारी त्यांनी दूरध्वनी वर जिल्हाधिकारी श्री.रविन्द्र ठाकरे यांच्याशी चर्चा करून रेमडेसिवीरची किंमत निर्धारित करण्याची कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

हेही वाचा -मरण स्वस्त, सरण महाग!!! औरंगाबादमध्ये अंत्यसंस्काराच्या लाकडांच्या दरात वाढ

हेही वाचा -मुंबईतील तळीरामांसाठी खुशखबर, घरपोच मिळणार दारू

ABOUT THE AUTHOR

...view details