महाराष्ट्र

maharashtra

नागपूरला मोठा दिलासा; १३० दिवसानंतर मृत्यूचा आकडा शून्य

By

Published : Jun 18, 2021, 8:04 PM IST

नागपूरकरांनी दाखविलेला संयम, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेले अथक परिश्रम,मनपाच्या चमूने केलेले कार्य अशा एकत्रित प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे.

death-toll-is-zero-in-nagpur-after-day-130-dyas
नागपूरला मोठा दिलासा; १३० दिवसानंतर मृत्यूचा आकडा शून्य

नागपूर- नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी (दि.१८ जून) शहरात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही झाली. मार्च, एप्रिल, मे या तीन महिण्यात कोरोनामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु धीर, संयम आणि संघटितपणे सामना करणाऱ्या नागपूरकरांनी कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणली आहे.

नागपूरला मोठा दिलासा; १३० दिवसानंतर मृत्यूचा आकडा शून्य

मृत्यूचा आकडा होत आहे कमी

प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी (दि.१८ जून) नागपूर शहरातील एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. विशेष म्हणजे तब्बल १३० दिवसानंतर नागपूरकरांना हा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी शहरात मृत्यूचा आकडा शून्य नोंदविला गेला होता. त्या दिवशी शहरात २२३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. ३१५ रुग्ण बरे झाले होते आणि एकूण २४३८ रुग्ण सक्रीय होते. तब्बल १३० दिवसानंतर म्हणजे गुरुवार (१७ जून) रोजी शहरात ६७६० चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३४ रुग्ण पॉझिटिव्ह नोंदविण्यात आले. ९४ रुग्ण बरे झाले. सद्यस्थितीत शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५५ इतकी आहे. नागरिक, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाच्या प्रयत्नाने मृत्युचा आकडा शून्यावर आला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन आणखी कठोरतेने करण्याची गरज आहे.

या यशाचे अनेक मानकरी - मनपा आयुक्त

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध, नागपूरकरांनी दाखविलेला संयम, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेले अथक परिश्रम, जिल्हा प्रशासन, महापालिका पदाधिकारी, प्रशासन यांनी ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी, बेडसंख्या वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि मनपाच्या चमूने केलेले कार्य अशा एकत्रित प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. असे, आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details