नागपूर :एकीकडे उपराजधानी नागपूर जिल्हा व्हायरल तापाने फनफणत असताना कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालत आहे. त्यातच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट एच३एन२ सुद्धा डोकंवर काढू लागला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क होण्यापूर्वीच एका संशयित एच३ एन२ बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यू झालेले संशयित एच३एन२ रुग्ण हे ७८ वर्षांचे होते.
एच३एन२ चाचणी पॉझिटिव्ह : त्यांना उच्चरक्तदाब आणि इतर देखील व्याधी होत्या. त्यांची एच३एन२ चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा मृत्यू हा एच३एन२ मुळेच झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आज डेथ ऑडिट केले जाणार आहे. त्यानंतर याबाबत स्पष्टता येणार आहे. रिपोर्ट आल्यानंतर मृत्युचे नेमके कारण समोर येईल.
व्हायरल तापाने नागपूर फनफनतोय :गेल्या आठवड्यात नागपूरात आठ कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण सुद्धा वाढत आहेत. गेल्या आठवड्यात व्हायरल फिवरमुळे नरखेड येथे एका चार वर्षीय मुलीच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अहमदनगरमध्ये एच३एन२ या इन्फ्लूएंझाची लागण झालेल्या एका रूग्णाचा मृत्यु झाला आहे. या रुग्णांच्या संख्येत अलीकडे वाढ झाल्याचे दिसून येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेसांगितले की, काही प्रकरणांमध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि जुलाब अशा रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. ताप शेवटी निघून जातो. तर तीन आठवडे खोकला टिकू शकतो. सामान्य सर्दी ताप हे या आजाराचे लक्षणे आहेत. या आजाराचा वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिला यांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे.
हेही वाचा : H3N2 death in Maharashtra : महाराष्ट्रात H3N2 चा पहिला मृत्यू? कोरोनासह इन्फ्लूएंझाची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू