महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​​​​Devendra Fadnavis Statement मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची होणार चौकशी - देवेंद्र फडणवीस - तारांकित प्रश्न

मुंबईत अनेक ठिकाणी झोपडपट्टी परिसर आहे. त्याचा विकास करण्यासाठी सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजना ( Slum rehabilitation project )सुरू केली आहे. मात्र कुर्ला येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात ( Survey of slum rehabilitation project In Mumbai ) तक्रारी प्राप्त झाल्या आहे. काही ठिकाणी मृत व्यक्तीचे तर काही ठिकाणी अपात्र व्यक्तीची नावे सर्वेक्षणात आली आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यात याबाबतची चौकशी केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis Statement ) यांनी विधान परिषदेत सांगितले.

Devendra Fadnavis Statement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 29, 2022, 3:45 PM IST

नागपूर - शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या ( Survey of slum rehabilitation project ) परिशिष्ट - २ च्या सर्वेक्षणात काही मृत तसेच अपात्र व्यक्तीची नावे समाविष्ट ( Survey of slum rehabilitation project In Mumbai ) झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाची पुढील दोन महिन्यात चौकशी केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis Statement ) यांनी आज विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर, जयंत पाटील, अनिल परब, सतेज पाटील, सुनील शिंदे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

तर विकासकावर काम थांबवण्याची सूचनाझोपडपट्टी पुनर्वसन योजना ( Survey of slum rehabilitation project In Mumbai ) अधिक गतिमान करण्यासाठी शासनाने नवीन धोरण हाती घेतले आहे. भोगवटा आणि एक रकमी रक्कम यात भरण्याबाबत सुधारणा करण्यात येईल. या योजनांना जलद गतीने मान्यता देणे, त्याचबरोबर ऑटो डी. सी. आर. पद्धत अवलंबवण्यात येणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद के​​ले. मुंबईतील कुर्ला येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात ( Survey of slum rehabilitation project In Mumbai ) तक्रारी प्राप्त झाल्या आहे. आयआयटी पवई यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सुचविलेल्या दुरुस्त्या विकासकामार्फत सहा महिन्यात पूर्ण केल्या जातील. विकासकाने या दुरस्त्या केल्या नाही, तर विकासकावर काम थांबविण्याची सूचना देण्यात येईल, असे फडणवीस ( DCM Devendra Fadnavis Statement ) यांनी सांगितले.​​

काही रहिवासी काम करू देत नाहीतझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात ( Survey of slum rehabilitation project In Mumbai ) काही रहिवासी काम करू देत नाहीत किंवा विकासक काम करत नाही. त्यामुळे स्वयंपूर्ण विकास करण्याबाबत शासन विचारधीन आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनवर्सनात पात्रतेचे १३ निकष ठरविण्यात आले. यासाठी सादर करण्यात आलेले आधार कार्ड चुकीच्या पद्धतीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून आधार कार्डची नव्याने पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस ( DCM Devendra Fadnavis Statement ) यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details