नागपूर -नागपूर महानगरपालिकेचे ५४ वे महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पदभार स्विकारला. त्याच बरोबर उपमहापौर मनीषा धावडे यांनीदेखील आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. मनपाच्या प्रशासकीय इमारतीचा आवारात हा प्रदग्रहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या निवडणूका -
मावळते महापौर संदीप जोशी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यात महापौर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ५ जानेवारीला ऑनलाइन पद्धतीने महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली होती. ज्यामध्ये भाजपचे जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आणि मनीषा धवड यांनी दणदणीत विजय मिळवला होता. आज या दोन्ही नेत्यांनी पदभार स्विकारला.