महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime : लेकीने घडवला बापाचा खून, बापाचे 'ते' प्रकरण लेकीच्या डोक्यात गेलं मग थेट दिली हत्येची सुपारी - नागपूर खुनाचा गुन्हा

सहा दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात पेट्रोल पंप मालक दिलीप सोनटक्के यांची हत्या झाली होती. याप्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला तीन आरोपींना अटक केली होती. आता मात्र पोलिसांना हत्येची दुपारी देणारा मास्टर माईंड हाती लागला आहे. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हत्येमागे असलेल्या सूत्रधाराचा बुरखा फडला असल्याने अतिशय धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पेट्रोल पंप मालक दिलीप सोनटक्केची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी घडवून आणली नसून दिलीप सोनटक्के यांच्या मुलीनेच वडिलांची हत्या सुपारी देऊन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

dileep sontakke
दिलीप सोनटक्के

By

Published : May 24, 2023, 3:41 PM IST

Updated : May 24, 2023, 8:22 PM IST

ह्त्येचा सीसीटीव्ही

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एका पेट्रोल पंपचे मालक दिलीप सोनटक्के यांची त्यांच्या कार्यालयातचं निर्घृण हत्या झाली होती. पेट्रोल पंपच्या केबिनमध्ये सोनटक्के बसले असताना तीन आरोपींनी दिलीप सोनटक्केवर धारदार शस्त्रांनी वार केले होते. त्यावेळी दिलीप सोनटक्के यांचा घटनास्थळीस मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सुरुवातीला तीन आरोपांनी अटक केली. या आरोपींच्या चौकशीत या हत्येमागील मास्टर माईंड पोलिसांच्या हाती लागला आहे. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे मुलीने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली होती. दरम्यान मुख्य आरोपी प्रिया माहूरतळे हिला पोलिसांनी अटक केली आहे.

दरोडेखोरांनी हत्या केल्याचा बनवा: दिलीप सोनटक्के यांचा खून दरोड्यांचा उद्देशाने झाली असल्याचा बनाव करण्यात आला होता. यासाठी आरोपींनी कॅश काऊंटरवरील पैसे लंपास केले होते. मात्र सुरुवाती पासूनच ही घटना केवळ चोरीची नसून यामागे काहीतरी वेगळे कारण असेल असा पोलिसांना संशय होता. या संशयातूनच सखोल तपास करत पोलिसांनी दिलीप सोनटक्के यांचा खून हा सुपारी देऊन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दिव्यांग मुलीने का दिली बापाची सुपारी: आरोपी मुलगी प्रिया माहूरतळे ही दिलीप सोनटक्के यांची मोठी विवाहित मुलगी आहे. ती डाव्या हाताने दिव्यांग आहे. हिनेच आपल्या बापाच्या हत्येची सुपारी दिली. वडिलांच्या हत्येसाठी तिने तीन आरोपींना सुपारी दिली. लेकीनेच आपल्या बापाच्या हत्येची सुपारी का दिली याचा तपास पोलिसांनी घेतला असता एक धक्कादायक बाब सर्वांसमोर आली. मृत दिलीप यांचे उमरेड येथील एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. शिवाय मागील वर्षभरापासून ते उमरेड येथे फ्लॅटमध्ये पती-पत्नी सारखे राहत असल्याने सोनटक्के कुटुंबात वाद सुरू होता. दिलीप सोनटक्के यांचा पेट्रोल पंप व प्लॉटचा व्यवसाय होता. विवाहबाह्य संबंधांमुळे कौटुंबिक प्रॉपर्टी सुद्धा हातातून जाईल, अशी भीती आरोपी प्रियाला होती. याच कारणावरुन मुलीने स्वतःच्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिली.

कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा तपास सुरू:दिलीप सोनटक्के यांचा खून करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. आरोपींशी कॉन्टॅक्ट कोणी केला? यासाठी आरोपींना कोणी किती रक्कम दिली? या घटनेत केवळ प्रिया एकटीच आहे की आणखी इतर कोणी आरोपी आहेत ? याचा तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा -

  1. Chandrapur Crime : कार, तरुणी आणि नंबर प्लेट; रावत गोळीबार प्रकरणी नेमके काय घडले, जाणून घ्या
  2. Rape On Teacher : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत नराधमाचा शिक्षिकेवर अत्याचार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  3. Firing in Pune: पिंपरी चिंचवड शहरात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, आरोपी पसार
Last Updated : May 24, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details