नागपूर - काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मिरची या पिकांना मोठा फटका बसला आहे. मौदा सोबतच नरखेड, कलमेश्वर, सावनेर आणि उमरेड तालुक्यात सुद्धा अवकाळी पावसाने हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे.
सलग दोन दिवस नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. नरखेड तालुक्यातील सिंजर आणि कुही तालुक्यातील पचखेडी येथे गारपीट झाली त्यामुळे हरभरा,गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. आज सुद्धा नागपूर शहरात ढगाळ वातावरण कायम असल्याने आज देखील पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.