महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर कारागृहात असलेल्या कुख्यात संतोश आंबेकर आणि राजा गौस कोरोनाच्या विळख्यात - santosh ambekar nagpur

नागपुरात गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवरही कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संतोश आंबेकर आणि राजा गौस कोरोनाच्या विळख्यात
संतोश आंबेकर आणि राजा गौस कोरोनाच्या विळख्यात

By

Published : Jul 16, 2020, 4:27 PM IST

नागपूर - नागपूर कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांच्यासह येथील कैद्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यातच, आता कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड असलेल्या संतोष आंबेकर व राजा गौस या दोघांनाही कोरोनाची लागण झाली असून दोघांवरही कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कधीकाळी नागपूर शहरात दहशत माजवणारे कुख्यात गुंड संतोष आंबेकर व राजा गौस या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांवर नागपुरात अनेक गुन्हे दाखल आहेत. कारागृहातील कर्मचारी, अधिकारी आणि कैदी असे एकूण २९९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा गँगस्टर संतोष आंबेकर गेल्या काही महिन्यांपासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, संपत्ती हडपणे, सारखे अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तर, एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौससुद्धा नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. या दोघांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांवरही कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details