नागपूर- शहरातील कुख्यात गुंडाची रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाचगाव जवळील डोंगरगाव येथे हत्या करण्यात आली. कार्तिक तेवर, असे मृत गुंडाचे नाव असून हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, जुन्या वादातून ही हत्या झाली असाल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत.
नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या, कारण अस्पष्ट - नागपूर
कार्तिक रविवारी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेला होता. त्यानंतर घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर डोंगरगावजवळ त्याची हत्या झाल्याचे समजले.
![नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या, कारण अस्पष्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3392631-thumbnail-3x2-ngp.jpg)
मृत कार्तिक तेवर
कार्तिक तेवर हा मित्राच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत जिल्ह्यातील पाचगाव (डोंगरगांव) येथे गेला होता. त्याचठिकाणी त्याची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलीस वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी असलेल्या मित्रांची कसून चौकशी करीत आहेत. जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरू केला आहे. याप्रकरणातील सर्व आरोपी नागपूर शहरातील असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : May 27, 2019, 11:03 AM IST