महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर खंडपीठाने दिल्या ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याच्या सूचना

राज्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, जिल्हा प्रशासन, मनपा व पोलिसांनी त्वरित निर्णय घेऊन एक ऑक्सिजन प्लांट उभारून ऑक्सिजनची अडचण सोडण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्या आहेत.

नागपूर खंडपीठ
नागपूर खंडपीठ

By

Published : Apr 13, 2021, 4:53 PM IST

नागपूर - नागपूरात कोरोनाने विक्राळ रूप धारण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणेने एकत्र येऊन पावले उचलावीत. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, मनपा व पोलिसांनी त्वरित निर्णय घेऊन एक ऑक्सिजन प्लांट उभारून ऑक्सिजनची अडचण सोडण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्या आहेत. यासोबतच पालकमंत्री यांनी लक्ष घालत मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधावा असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

नागपूरात ऑक्सिजन प्लॅन्ट
नागपूर खंडपीठासमोर एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती झें. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी सुनावणीदरम्यान नागपुरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सूचना दिल्यात. एक ऑक्सिजन प्लांट ज्यामध्ये साधारण 900 ऑक्सिजन सिलेंडर दररोज मिळू शकेल. अशा स्वरुपाच्या प्लान्ट उभारणीसाठी 10 कोटींच्या घरात खर्च अपेक्षित माहिती अधिवक्ता यांनी एका ऑक्सिजन उत्पादकांचा दाखला देऊन न्यायालयापुढे मांडले. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुभाष झंवर आणि ऍड. कमल सतुजा यांची जनहित याचिका सुनावणीसाठी जोडून घेण्यात आली.
न्यायालय
रुग्णालायतील फोटो व्हिडिओवर बंदी, सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना...

कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. यात रुग्णलयाच्या आतील फोटो व्हिडीओ नातेवाईक काढून व्हायरल करतात. यामुळे हे फोटो व्हिडीओ काढण्यावर बंदी घातली आहे. या सोबत रुग्णालयात तोडफोडीच्या घटना अधिक घडत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने रुग्णलाय परिसरात पेट्रोलिंग वाढवावी अशाही सूचना दिल्या आहे. रुग्णालय परिसरात कोणी गोंधळ घातल्यास तात्काळ कारवाई करावी अश्या सूचनाही दिल्यात.

महापौरांनी शपथ पत्र सादर करावे...

नागपूरात 500 बेडचे जम्बो कोव्हीड हॉस्पिटल मानाकापूर स्टेडियमवर उभे करावे अशा सूचना मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. यामुळे महापौर आणि मनपा आयुक्त यांनी न्यायालयात शपथपत्र दाखल करावे अशा सूचना न्यायालयाने केल्या आहेत. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्य शासनाच्या वतीने ऍड. केतकी जोशी, मनपाकडून ऍड एस एम पुराणिक, माध्यस्थांकडून टी.डी. मंडलेकर यांनी युक्तिवाद करत बाजू मांडली.

ABOUT THE AUTHOR

...view details