नागपूर -जिल्ह्यात मागील एक महिन्यात पॉझिटिव्हीटी दरात कमालीची घसरण झाली आहे. एप्रिल महिन्यात दुसऱ्या लाटेत उच्चांक गाठलेला हा दर 34 च्या घरात जाऊन पोहचाला होता. मागील महिन्याभरात या दरात घसरण होताना दिसून आली. शनिवारी आलेल्या अहवालात हा दर 0.80 म्हणजे 1 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. याचबरोबर रिकव्हरी रेट वाढून 97.68 वर आल्याने बरे होणाऱ्या रुग्णसंख्या वाढून मृत्युदरात घट झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी शहर आणि ग्रामीण मिळून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
254 जण कोरोनामुक्त -
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात 9 हजार 386 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 75 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शहरी भागात 27 तर ग्रामीण भागात 45 बाधित रुग्ण मिळून आले आहे. शहरी भागात 1, तर ग्रामीण भागात 2, तर जिल्ह्याबाहेरील 3 जण दगावले आहे. तेच 254 जणांपैकी शहरात 160 तर ग्रामीण 94 जण कोरोना मुक्त झाले आहे. 429 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 1 हजार 633 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.
आतापर्यंतची परिस्थिती -