नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक शपथपत्र प्रकरणात न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयामध्ये आज मंगळवारी यावर सुनावण घेण्यात आली.
मुख्यमंत्र्यांना निवडणूक शपथपत्र प्रकरणात न्यायालयाचा दिलासा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथपत्र प्रकरण
निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येणाऱ्या शपथपत्र घेताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नियमांचे पालन केले नाही, याविरुद्ध नागपुरातील वकील सतीश उके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित पोलीस यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयाने सुनावणी घेतली.
![मुख्यमंत्र्यांना निवडणूक शपथपत्र प्रकरणात न्यायालयाचा दिलासा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4757967-thumbnail-3x2-cm.jpg)
निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येणाऱ्या शपथपत्र घेताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नियमांचे पालन केले नाही, याविरुद्ध नागपुरातील वकील सतीश उके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित पोलीस यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने निश्चित केलेले दिशानिर्देश व नियमांचे पालन निवडणूक अधिकाऱ्याने केले असल्याचे शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्याने न्यायालयात सादर केले. त्यानंतर उच्च न्यायालयाने सतीश उके यांची याचिका निकाली काढली. तसेच याचिकाकर्त्याला योग्य मंचावर जाण्याची मुभाही न्यायालयाने दिली.