महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 15, 2023, 9:51 AM IST

ETV Bharat / state

Dictionary From Tribal Dialects:' आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन; आदिवासींच्या बोलीभाषेतून जोडप्याने तयार केली शब्दकोशाची निर्मिती

महाराष्ट्रात आदिवासी समाजात कोरकू, पावरी, भिलाली, निहाली, कोलामी, कातकरी, गोंडी आणि पारधी याप्रमुख समूहाचा समावेश आहे. यापैकी कोकरू आणि पवारी या दोन प्रमुख भाषा मेळघाट क्षेत्रात बोलल्या जातात. आचार्य ऋषिकेश खिलारे आणि हर्षदा लोंढे-खिलारे यांनी आदिवासींच्या सर्व भाषांवर संशोधन करून सुमारे तीन लाख बोलीभाषा शब्दांचा शब्दकोश तयार केला आहे. याबद्दल सविस्तर या विशेष रिपोर्टमधून जाणून घेवू या.

dictionary from tribal dialects
आदिवासींच्या बोलीभाषेतुन शब्दकोश

आदिवासींच्या बोलीभाषेतुन शब्दकोश- आचार्य ऋषिकेश खिलारे आणि हर्षदा लोंढे-खिलारे

नागपूर :भारत देशाचे मूलनिवासी म्हणून आदिवासींचा उल्लेख केला जातो. एका प्रकारे आदिवासी हे भारताच्या आधुनिक समाजाचा प्राणवायू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आदिवासी समाजाने आजही त्यांची समृद्ध व वैभवशाली परंपरा जपली आहे. परंतु भाषेच्या मुख्य अडचणीमुळे आदिवासी समाजातील विद्यार्थी फारशे शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्याची आचार्य ऋषिकेश खिलारे आणि हर्षदा लोंढे-खिलारे या दाम्पत्याने आदिवासी बोलीभाषांच्या शब्दकोश निर्मितीचे कार्य त्यांनी हाती घेतले. यामध्ये ४९ भाषांचा समावेश करण्यात आला आहे. भाषेमुळे निर्माण होत असलेली समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मायबोली भाषा संशोधन अभियानाची सुरुवात केली. आचार्य ऋषिकेश गेल्या दहा वर्षांपासून मेळघाट येथे वास्तव्यास आहे.


ऋषिमेळा गुरुकुलम :आदिवासी मुला- मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी. तसेच शब्दकोष व इतर भाषांमध्ये संशोधनासाठी ऋषिमेळा गुरुकुलमची स्थापना जळगाव, जामोद येथे लवकरच करण्यात येणार आहे. ऋषिमेळा गुरुकुलम येथे आधुनिक सुविधा असलेली मानवशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय प्रयोगशाळा, क्रीडासंकुल, मुलींसाठी छात्रावास, उद्योजकता भवन, गोशाळा, पोषण आहारासाठी वाडी, टेक्नोपार्क, आदिवासी संस्कृती संग्रहालय सोय येथे असणार आहे, अशी माहिती राईज फाऊंडेशनच्या संचालक हर्षदा लोंढे-खिलारेंनी दिली आहे.


पावरी समाजाची माहिती :महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातचा सीमाभाग सातपुडा डोंगररांगांनी व्यापला आहे. डोंगरांच्या कुशीत, दुर्गम भागातील वनांत पावरा समाजाचे वास्तव्य आहे. हा समाज बारेला या नावाने ही ओळखला जातो. महाराष्ट्रातील बुलडाणा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशात मुख्यतः बड़वानी, खरगोन, धार व झाबुआ जिल्ह्यांत पावरा समाज विखुरला आहे. भौगोलिक क्षेत्रानुसार पावरा समाजातील चालीरीतीत विविधता पाहावयास मिळते.

पावरांना 'भारवट्या' संबोधले जाते :नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस नर्मदा काठावरील नोंददळ्या, अक्राणी (धडगांव) तालुक्यात पावरांना 'भारवट्या' संबोधले जाते. तसेच नंदुरबारमधील शहादा व तळोदा तालुक्यांसह धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पठारी व सपाट पट्ट्यात राहणाऱ्या पावरांना 'देहवाल्या' या नावाने संबोधले जाते. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर हाच समाज निंबाळ्या, राठवा या नावानेही ओळखला जातो.

हेही वाचा :

  1. President On Tribal Women : आदिवासी महिला असल्याचा अभिमान आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
  2. Marriage of Two Trees in Koraput : आदिवासी समाजाने लावले दोन झाडांचे अनोखे लग्न, वाचा कारण
  3. Gadchiroli Ashram School: गडचिरोलीतील आदिवासी मुलांचे पोषणस्तर सुधारण्यासाठी आश्रमशाळेत बसवले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मशीन

ABOUT THE AUTHOR

...view details