नागपूर - येथील महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका दुर्गा हत्तीठेले यांचे सदस्यत्त्व रद्द करण्यात आले आहे. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्यात आले आहे. दुर्गा हत्तीठेले या भाजपच्या प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका आहेत.
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द - Nagpur Municipal Corporation Election
नागपूर मनपाच्या निवडणूका तोंडावर आलेल्या असतानाच भाजपच्या नगरसेविका दुर्गा हत्तीठेले यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्यात आले आहे.
न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता
नागपूर महापालिका निवडणुकीचा मुहूर्त केवळ आठ महिन्यांवर आला असताना, दुर्गा हत्तीठेले यांचे नगरसेवकपद राज्य सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. दुर्गा हत्तीठेले या (२०१७)मध्ये झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अनुसूचित जाती प्रवर्गात प्रभाग क्रमांक पाचमधून निवडून आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेविका पद रद्द करण्याची शिफारस तत्कालीन आयुक्तांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, दुर्गा हत्तीठेले यांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याने, न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर स्थगिती आदेश दिला होता. (२०१८)मध्ये न्यायालयाने दुर्गा हत्तीठेले यांची याचिका फेटाळत त्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यांना सुरवातीला सहा महिने, त्यानंतर १२ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्यांनी जात प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने, अखेर दुर्गा हत्तीठेले यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.