महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होळीच्या उत्साहापुढे कोरोनाची दहशत शून्य; होळीत कोरोना विषाणूचे दहन - नागपूर होलिका दहन

नागपूरात 'नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स'च्यावतीने होलिका दहन करण्यात आले. यामध्ये कोरोना विषाणूचे दहन करण्यात आले. यावर्षी कोरोना विषाणूचा धोका असल्याने कोरडी होळी खेळण्याचे आवाहन सरकारी यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

Corona Virus Symbolically burnt
कोरोना विषाणू दहन

By

Published : Mar 10, 2020, 7:41 AM IST

नागपूर - राज्यात सोमवारी सर्वत्र होलिका दहन करण्यात आले. होळीच्या सणावर कोरोना विषाणूचे सावट असताना देखील नागपूरात 'नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स'च्यावतीने होलिका दहन करण्यात आले. यामध्ये कोरोना विषाणूचे दहन करण्यात आले. जीएसटीचा दंड आणि आर्थिक मंदीचेही होलिकामध्ये दहन करण्यात आले.

होळीत कोरोना विषाणूचे दहन

कोरोना विषाणूचा धोका असल्याने कोरडी होळी खेळण्याचे आवाहन सरकारी यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी रंग आणि गुलालाविना कोरडी होळी साजरी करत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details