नागपूर - गेल्या तीन दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची नोंद झाल्यावर शुक्रवार नागपूरकरांसाठी थोडासा दिलासादायक राहिला. शुक्रवारी दिवसभरात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. या नवीन बाधितांसह जिल्ह्यातील एकूण संख्या २६९ एवढी झाली.
नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या २६९वर
शुक्रवारी दिवसभरात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. या नवीन बाधितांसह जिल्ह्यातील एकूण संख्या २६९ एवढी झाली.
शहरातील पार्वती नगर येथील मृत कोरोना बाधिताच्या संपर्कातील १०६ व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला थोडा दिलासा मिळाला. दक्षिण नागपुरातील २२ वर्षीय तरुणाचा ५ मे ला शासकीय मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर ६ मे रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ज्यामुळे त्याच्या कुटुंबातील व परिसरातील सुमारे २३० नागरिकांना कॉरंटाईन करण्यात आले होते. यापैकी १०६ जणांचा अहवाल आज निगेटिव्ह आला तर मृत तरुणाच्या संपर्कातील एकाचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.
सोबतच शहरातील विविध भागातील तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या तिघांनाही 'सारी' रोगाची लागण झाली होती त्यानंतर त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला.
नागपुरातील ८ मे संध्याकाळपर्यंतचे अपडेट -
एकूण पॉजिटीव्ह नमुने - २६९
मृत्यू - ०३
कोरोनामुक्त - ६८