नागपूर - दिल्ली-चेन्नई या तामिळनाडू एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या कोरोना संशयितास रेल्वेतून उतरवण्यात आले आहे. हा प्रकार नागपूरच्या रेल्वे स्थानकावर घडला असून त्याच्या मनगटावर असलेल्या होम क्वारंटाइनच्या शिक्क्यामुळे तो निदर्शनास आला.
हातावर क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या कोरोना संशयिताला रेल्वेतून खाली उतरवले २२ वर्षीय तरुण हा रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असून तो राशियावरून दिल्लीला आला होता. दिल्लीमध्ये त्याच्या मनगटावर होम क्वारंटाइनचा शिक्का लावला होता. परंतु, दिल्लीतच थांबण्याऐवजी तो मुळगाव असलेल्या आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जाण्यासाठी तामिळनाडू एक्सप्रेसने निघाला.
हेही वाचा -Janatacurfew : अशीच इच्छाशक्ती 31 मार्चपर्यंत दाखवा - तुकाराम मुंढे
मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकाजवळ या तरुणाच्या मनगटावर शिक्का असल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यावर याची सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. दरम्यान, रेल्वे नागपुरात पोहोचल्यावर या तरुणाला शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या उपस्थित बोगीतून खाली उतरवून रुग्णालयात पाठवण्यात आले. हा तरुण प्रवास करत असलेल्या बोगीत एकूण ६० प्रवासी असून या बोगीचे निर्जंतुकीकरण करून रेल्वे पुढे रवाना करण्यात आली आहे.
हेही वाचा -'जनता कर्फ्यू' : नागपूर बंद, रेल्वे स्थानकावर तुरळक गर्दी