महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 2, 2021, 1:33 PM IST

ETV Bharat / state

नागपूर महापौर दयाशंकर तिवारींना कोरोना

नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

dayashankar tiwari
दयाशंकर तिवारी

नागपूर : नागपुरात कोरोनाने कहर केला आहे. आता नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौरांनी स्वतः या बद्दल माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही दयाशंकर तिवारींनी केले आहे. दरम्यान, त्यांची तब्येत उत्तम आहे. ते सध्या गृह विलगीकरणात आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. त्यातच आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. अश्या परिस्थितीमध्ये नागपूर महानगराचे पहिले नागरिक म्हणून महापौर दयाशंकर तिवारी सातत्याने लोकांना भेटून त्यांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच ते नागपूरचे महापौर म्हणून निर्वाचित झाले आहेत. तेव्हापासून ते सतत कार्यरत आहेत. आज त्यांना कोरोना झाला आहे.

काही दिवसांपूर्वी घेतली होती लस

महापौर दयाशंकर तिवारी यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांनी स्वतःची देखील कोरोना चाचणी करून घेतली. ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे त्यांनी संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा -मुंबईतील 'लोकल'वर लागणार कठोर निर्बंध; विजय वडेट्टीवारांची माहिती

हेही वाचा -मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details