महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; 63 नवीन कोरोना रुग्णांची भर - नागपूर कोरोना रुग्ण संख्या

गेल्या 24 तासांत नागपूर शहरात 63 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 744 झाली आहे. तर 35 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 350 इतकी झाली आहे.

नागपूर कोरोना अपडेट
नागपूर कोरोना अपडेट

By

Published : Jul 6, 2020, 10:15 AM IST

नागपूर - गेल्या 24 तासांत नागपूर शहरात 63 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 744 झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या 24 तासांत 35 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 350 इतकी झाली आहे. शिवाय, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 26 झाली आहे.

महत्वाचं म्हणजे 26 पैकी 10 मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. सध्या नागपूरात 368 रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथे उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 77 टक्के इतके आहे.

देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. त्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढही होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. अनलॉक-१ प्रमाणेच अनलॉक-२ मध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details